नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे (FAQ)

पुढील माहिती नंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट द्वारे आमच्याशी संपर्क साधा.

जवळपासच्या प्रत्येक घरामधली स्त्री, रोज घरी जेवण बनवते... ते घरगुती, साधं-सुधं जेवण कोणत्याच हॉटेलमध्ये मिळत नाही... आणि दुसऱ्या बाजूला बघितले तर घरचे साधे जेवण अनेकांना प्रयत्न करूनही मिळत नाही. तर आपण, प्रत्येक गृहिणीला जी जेवण खूप छान बनवते तिला मायमा म्हणून रजिस्टर करून घेतले आणि ती तिच्या घरी रोज काय काय बनवणार आहे ते मायमा अँपवर सांगायला सांगितले. ज्यामुळे घरच्या जेवणाच्या शोधात फिरणारा प्रत्येक जण आपल्या मायमा अँपमध्ये बघतो कि त्यांच्या जवळपासच्या घरात काय काय जेवायला बनविले जाणार आहे आणि त्याप्रमाणे, त्या मायमाला त्यांच्यासाठीही बनवायला सांगतो. म्हणजे घरचा स्वयंपाक करता करता तीला पैसे कमवता येतात आणि अनेकांना घरच्यासारखं नाही तर घरचंच जेवण मिळते!

मायमा म्हणजेच आई, गृहिणी जी आईप्रमाणे प्रेमाने आणि रुचकर जेवण बनवून देते; 'कस्टमर' म्हणजे खवय्ये... आणि या दोघांना जोडणारा 'मायमा प्लॅटफॉर्म' म्हणजेच आपले मायमा अँप.

मायमा अँपवर तुम्ही आज काय जेवण बनवणार आहात ते सांगायचे म्हणजेच मील पब्लिश करायचे आणि जितक्या ऑर्डर येतील तितकेच एक्स्ट्रा जेवण बनवून ते जेवण द्यायचे!त्यासाठी तुम्हाला फक्त ३ गोष्टी करायच्या आहेत
स्टेप १ - मायमा अँपवर रजिस्ट्रेशन (बिनाशुल्क) करायचे.
स्टेप २ - तुम्ही कोणत्या दिवशी काय जेवण बनवणार आहात ते सांगायचे म्हणजेच मील पब्लिश करायचे
स्टेप ३ - आणि आलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण बनवून द्यायचे!

नाही. मील केव्हा पब्लिश करणे हे पूर्णतः तुमच्यावर आहे, याकरिता आमचे कुठलेच बंधन नाही. तुम्हाला शक्य असेल तेव्हाच तुम्ही मील पब्लिश करावे.

मायमा उपक्रम हा स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा एक सामाजिक उपक्रम आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी अथवा ऑर्डरमधून कमिशन द्यावे लागत नाही. मात्र ऑनलाईन पेमेंट, ऑर्डर कॉल्स आणि इ. सेवेसाठी प्रत्येक ऑर्डरवर नाममात्र ५% प्लॅटफॉर्म फी आकारली जाते.

इंटरनेटवरचे फोटो अपलोड केले पण तुम्ही देत असलेले जेवण तसे नसेल तर कस्टमरचा तुमच्यावरचा विश्वास कमी होईल आणि ते तुम्हाला ऑर्डर देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतः बनवलेल्या पदार्थांचे फोटो काढून अपलोड करा. फोटो कसे काढावे यासाठी दिलेला हा व्हिडीओ बघा


मायमा प्लॅटफॉर्मवर मील/जेवण डिलिव्हरीचे ३ पर्याय उपलब्ध आहेत.

1. 'कस्टमर पिकअप' (कस्टमर स्वतः ऑर्डर घेऊन जातात) - कस्टमर पिकअप पर्यायासाठी तुम्हाला मील ऍड करताना 'कस्टमर/Dunzo पिकअप' हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या घरचा पत्ता देऊ शकता, यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही तुमच्या सोसायटीचे गेट किंवा इतर ठिकाण निवडू शकता जे कस्टमरला सोयीस्कर असेल.
2. 'डिलिव्हरी' (मायमा स्वतः ऑर्डर कस्टमरपर्यंत पोहचवते) - जर तुम्ही स्वतः जेवण डिलिव्हर करू शकत असाल तर मील ऍड/पब्लिश करताना 'मी डिलिव्हर करेल' हा पर्याय निवडा; त्याचे तुम्हाला एक्सट्रा डिलिव्हरी चार्जेस सुद्धा मिळतील.
प्रत्येक मील पब्लिश करताना तुम्हाला, तुमच्या सोयीनुसार वरील २ पर्याय निवडायचे आहेत.
3. Dunzo डिलिव्हरी पार्टनर (जिथे Dunzo सेवा उपलब्ध आहे) - कस्टमर, ऑर्डर करताना डिलिव्हरी पर्याय निवडेल ज्याबद्दलची माहिती आपल्यालासुद्धा 'ऑर्डर' मध्ये दाखविली जाईल. फक्त यासाठी तुम्हाला मील ऍड/पब्लिश करताना 'कस्टमर/Dunzo पिकअप' हा ऑप्शन निवडायचा आहे.

व्यवसाय तुमचा आहे, जेवण तुम्ही बनवता, त्यामागे होणारा खर्च तुम्हालाच माहित आहे अणि म्हणूनच मील/जेवणाचे दर तुम्हीच ठरवता. पण दर शक्यतो माफक असावे. हॉटेल प्रमाणे दर आकारू नये. दर ठरविण्यासाठी एक सोपे सूत्र आहे : खर्च + पॅकिंग खर्च + अपेक्षित नफा = मील / जेवणाचे दर

काही कारणास्तव ऑर्डर पूर्ण करता येणार नसेल तर ती ऑर्डर कॅन्सल करावी. त्यासाठी अँपमध्ये 'ऑर्डर्स'मध्ये जाऊन त्या ऑर्डरवरील 'कॅन्सल ऑर्डर' बटनावर क्लिक करावे जेणेकरून कस्टमरला ऑर्डर कॅन्सल झाल्याचे कळेल आणि त्याची गैरसोय होणार नाही. (ऑर्डर कॅन्सल करण्यापूर्वी एकदा कॅन्सलेशनची पॉलीसी समजून घ्यावी)

नाही, मायमा प्लॅटफॉर्मची संकल्पना खूप सोप्पी आणि सरळ आहे. तुम्ही रोज तुमच्या घरात, तुमच्या घरच्यांसाठी जे काही बनविणार आहे ते प्लॅटफॉर्मवर पब्लिश करायचे. त्यामुळे तुम्ही जेवणाव्यतिरिक्त कुठलेही पदार्थ किंवा त्याचे साहित्य विक्रीस ठेऊ शकत नाही, तसे आढळल्यास, तुमचे मायमा प्लॅटफॉर्मवरचे रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते.

मायमा म्हणून रजिस्टर करणे खूपच सोप्पे आहे.
स्टेप १ - अँपमध्ये मायमा सेक्शनमध्ये जा (जर तुम्ही कस्टमर सेक्शनमध्ये असाल आणि अद्याप मायमा म्हणून रजिस्टर केले नसेल तर अकाउंट वर क्लिक करून, 'मायमा व्हा' वर क्लिक करा.)
स्टेप २ - विचारलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप ३ - बँकेची माहिती अपलोड करा!
रजिस्ट्रेशन प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा.

हो, तुमची माहिती मायमा प्लॅटफॉर्मवर देणे पूर्णपणे सुरक्षित आहे! आम्ही तुमची माहिती आणि कागदपत्रे कुठल्याही इतर व्यक्ती अथवा कंपनीसोबत शेअर करत नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्याचा गैरवापर करत नाही.

अन्न व औषधे विभाग म्हणजेच (FSSAI - Food Safety and Standards of India) हि एक सरकारमान्य संस्था आहे. हि संस्था विविध नियमांद्वारे, अन्न सुरक्षेची देखरेख करण्यासाठी आहे; ज्याचा उद्द्येश सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा आहे. कोणतीही अन्न विषयक खरेदी व विक्री करण्यासाठी FSSAI रजिस्ट्रेशन आवश्यक असते. मायमा प्लॅटफॉर्मवर व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी हे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

होय, FDA च्या नियमांप्रमाणे हे अनिवार्य आहे.

मायमा प्लॅटफॉर्म FSSAI रजिस्ट्रेशन करून देत नाही. तुम्ही संबंधित पोर्टलवर जाऊन स्वतः रजिस्टर करू शकता किंवा गोडॉक्स सर्व्हिसेसद्वारे FSSAI रजिस्ट्रेशन करू शकता.

होय! तुमचे ऑर्डरचे पेमेंट तुमच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले जात असल्याने बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.

तुम्ही जेवायला काय बनवणार आहेत ते अँपवर सांगणे म्हणजेच मील पब्लिश करणे. त्यासाठी तुम्हाला आधी तुमचे मेन्यू कार्ड म्हणजेच मील लिस्ट बनवणे आवश्यक आहे. मील कसे ऍड करावे हे समजून घेण्यासाठी कृपया दिलेला व्हिडिओ बघा!

मील लिस्ट मध्ये ऍड केलेले मील सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी ते मील पब्लिश करणे आवश्यक असते. मील पब्लिश कसे करावे हे समजून घेण्यासाठी कृपया दिलेला व्हिडिओ बघा!

जर मायमाने ऑर्डर रद्द केली तर तिच्यावर 10% दंड आकारला जाईल. जर कस्टमरने ऑर्डर रद्द केली तर मायमाला पैसे मिळणार नाही; मात्र मायमाने दिलेल्या 'स्वयंपाक सुरु करण्याच्या वेळेनंतर' कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली तर मायमाला ऑर्डरचे पूर्ण पैसे मिळतील.

ऑर्डर पुर्ण झाल्यानंतर ४ कार्यालयीन दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होतात.

कस्टमरने जेवण ऑर्डर केले पण जेवण तयार झाल्यावर कॅन्सल केले किंवा ते घ्यायला आला नाही तर तुमचे नुकसान होऊ नये म्हणून आपण कस्टमरकडून ऑर्डर करतानाच ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करून घेतो.

Dunzo पार्टनरची ऑर्डर पीकअप/डिलिव्हर करण्याची वेळ त्या ऑर्डरच्या माहितीमध्ये दिली आहे, त्या वेळेवर पार्टनर येईल. पत्ता शोधण्यास काही अडचण असल्यास ते तुमच्याशी संपर्क साधतील.

Chatnow


तुम्हाला तुमच्या ऑर्डरचे पेमेंट आले नसेल तर -

1. प्रोफाइल मध्ये जाऊन तुम्ही तुमचे नाव व्यवस्थित टाकल्याची खात्री करून घ्या. मराठी, हिंदी भाषेतील नाव किंवा @, #, $.... सारखे चिन्ह नाव दिले असल्यास ते बदला.
2. बँक अकाऊंटची दिलेली माहिती तपासून घ्या, चुकली असल्यास ती सुधारा(माहिती टाकल्यानंतर २ वेळा अँप चालू-बंद करून तपासून बघा की माहिती सेव्ह झाली आहे ना).
3. जर तुम्ही PayTM/PayPal चे बँक अकाउंट दिले असल्यास कृपया दुसऱ्या बँक अकाउंट द्यावे. PayTM/PayPal च्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले जात नाहीत.

प्रोफाइल मधील नाव किंवा बँकेची माहिती बदलल्यानंतर कृपया आम्हाला कळवावे जेणेकरून आम्हाला तुमची 'माहिती अपडेट' करण्याची प्रक्रिया सुरु करता येईल. बँकेची माहिती बदलल्यानंतर समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि पेमेंट तुमच्या बँकेत येण्यासाठी 15-20 दिवस लागतील

4. सर्व माहिती योग्य दिली असल्यास कृपया तुमच्या बँकेचे पासबुक तपासा. ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर ३ ते ५ कार्यालयीन दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात.
वर दिलेल्या कोणत्याही प्रकारे समस्येचे निराकरण झाले नसल्यास आमच्याशी संपर्क साधावा! Chat Button

Chatnow

कृपया आपल्याला येत असलेल्या समस्येचा स्क्रिनशॉट काढून पाठवावा आणि शक्य असल्यास त्याबद्दल सविस्तर माहिती द्या, जेणेकरून आम्ही तुमची समस्या सोडवू शकू

Chatnow

जर तुम्ही मील पब्लिश केले आहे पण दिसत नाही तर -
१. तुम्ही व्हेरीफाईड मायमा आहात का हे तपासा. मायमा अँपवरून जेवण देण्यासाठी व्हेरीफाईड मायमा असणे अनिवार्य आहे.
२. तुम्ही मायमा सेक्शनमध्ये होमपेजवर दिलेली 'ऑर्डर देण्याची वेळ' तपासा आणि योग्य ती वेळ निवडा.
३. तुम्ही दिलेली वेळ आणि तारीख किंवा वार तपासा.
४. तुम्ही दिलेला पत्ता तपासा.
तुम्ही दिलेल्या वेळ, वार, तारीख आणि लोकेशनवरच मील दिसेल. आणि ते तपासण्यासाठी कस्टमरच्या होमपेजवर तुम्हाला ते लोकेशन आणि तारीख निवडावी लागेल.
वर दिलेल्या कोणत्याही प्रकारे समस्येचे निराकरण झाले नसल्यास आमच्याशी संपर्क साधावा!

Chatnow

कृपया, 'तुमचा आत्ता मायमा अँपवर असलेला फोन नंबर' आणि 'नवीन बदलायचा नंबर' असे दोन्ही नंबर आम्हाला पाठवावे. नंबर बदलण्याच्या प्रक्रियेला ३-४ कार्यालयीन दिवस लागतील

Chatnow

कृपया तुमच्या फोन 'सेटिंग'मध्ये जाऊन मायमा अँपची नोटिफिकेशन सेटिंग 'ऑन' करावी (ती कशी करावी त्यासाठी दिलेली PDF चेक करा); आणि तरी देखील नोटिफिकेशन येत नसल्यास आम्हाला अँपमधील 'आमच्यासोबत संपर्क' विभागातून संपर्क साधावा.

Notification Pdf

आपल्याला ऑर्डर न मिळाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही 'मायमा प्लॅटफॉर्म'ची मार्केटिंग करतो पण ऑर्डर मिळवण्यासाठी मात्र प्रत्येक मायमाने मील पब्लिश केल्यावर ते तिच्या सोशल मीडियावर आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत शेअर करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा एक मायमा तिने पब्लिश केलेले मील शेअर करेल तेव्हाच आसपासच्या लोकांना त्याबद्दल कळेल आणि ते ऑर्डर करतील. (ऑर्डर मिळवण्यासाठी आपल्या लोकेशनवर घरच्या जेवणाच्या शोधात असलेले लोक असणेसुद्धा आवश्यक आहे.)

कृपया आपली तक्रार सविस्तररित्या आम्हाला कळवा. आम्ही त्याची पडताळणी करून तुमच्यासोबत संपर्क साधू आणि आवश्यक असल्यास योग्य ती कारवाईदेखील करू.

Chat Button

Gmail button

कृपया आपली तक्रार सविस्तररित्या आम्हाला कळवा. आम्ही त्याची पडताळणी करून तुमच्यासोबत संपर्क साधू आणि आवश्यक असल्यास योग्य ती कारवाईदेखील करू.

Chat Button

Gmail button

हो; मायमाने जेवण बनवून ठेवले असले आणि डिलिव्हरी पार्टनर आला नाही तर मायमाला तिच्या ऑर्डरचे पैसे मिळतात.

Chat Button

लोकेशन ऍड किंवा सेट करण्यासाठी -
१. आपले 3G/4G इंटरनेट किंवा WiFi व्यवस्थित काम करत आहे का ते तपासून बघा.
२. आपली लोकेशन कनेक्टिव्हिटी 'स्ट्रॉंग' आहे का ते तपासून बघा. (आपल्या फोनमधील 'मॅप'मध्ये जाऊन आपण हे तपासू शकता)
३. आपण 'मायमा अँपसाठी लोकेशन ऍक्सेस' (Access Location for Myma App) 'स्वीकार (Allow)' केला आहे का हे तपासून बघा.
त्यासाठी मायमा अँप सेटिंग्स (सेटिंग्स > अँप्स)मध्ये 'परमिशन' वर क्लिक करा. मग 'लोकेशन' वर क्लिक करा आणि स्वीकार (Allow) बटनावर क्लिक करा. तरीही समस्येचे निराकरण झाले नसल्यास आमच्याशी संपर्क साधावा!

Chat Button

तुम्हाला आलेली ऑर्डर अँपमध्ये 'मायमा' सेक्शनमध्ये ऑर्डर स्क्रीनवर दिसेल; मात्र आपल्याला ऑर्डर येऊन १० मिनिटे होऊन गेले असतील तर आपल्याला ऑर्डर दिसणार नाही कारण ऑर्डर स्वीकारण्यासाठी फक्त १० मिनिटांचाच वेळ आहे, त्यानंतर ऑर्डर एक्स्पायर होते.

Chat Button

फोटो अपलोड होत नाही (आधार कार्ड, मील पब्लिश, फसाई)
फोटो अपलोड करण्यासाठी -

१. आपले 3G/4G इंटरनेट किंवा WiFi व्यवस्थित काम करत आहे का ते तपासून बघा.
२. अँप बंद करून पुन्हा काही मिनिटांनी चालू करा.
३. मायमा अँप अपडेटेड आहे का तपासा, नसल्यास अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.
४. आपण अपलोड करत असलेल्या फोटोची साईज कमीत कमी ठेवा.
5. आपल्या फोनची स्टोरेज (माहिती, अँप आणि फाईल्स साठवण्याची क्षमता) तपासा. जर स्टोरेज फुल्ल झाले असेल तर अँपचा स्पीड कमी होईल, फोटो अपलोड होणार नाही आणि तुम्हाला अँप हाताळण्यामध्ये अडचण येईल.

तरीही समस्येचे निराकरण झाले नाही तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा!

Chat Button

आपल्या लोकेशनवर अनेक मायमा आणि कस्टमर उपलब्ध आहेत. परंतु त्यांची कोणत्याही प्रकारची माहिती कोणालाही देणे कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतर्गत येत नाही त्यामुळे आम्ही कोणतीही माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही.

मील पब्लिश करताना, जेवण देण्याची वेळ ही 'लोक सर्व साधारणपणे किती वाजता जेवतात किंवा नाश्ता करतात' याचा विचार करून निवडावी. जसे की सकाळचा नाश्ता अंदाजे ७ ते ११ मध्ये; दुपारचं जेवण १२ ते ३, संध्याकाळचा नाश्ता ४ ते ७ मध्ये तर रात्रीचे जेवण हे ७ ते ११ मध्ये होते.

मायमा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहे. ज्या ज्या भागात मायमा रजिस्टर करतील त्या त्या भागात ऑर्डरींग सुरु होईल.