प्रत्येकाला बाजूच्या घरातून जेवण ऑर्डर करता यावे यासाठी प्रत्येक आईने एकत्र येऊन बनवलेला प्लॅटफॉर्म म्हणजे मायमा प्लॅटफॉर्म.

बाहेरचं त्याच त्याच चवीचं आणि अनहेल्दी खाऊन प्रत्येकजण आपल्या आरोग्याशी खेळतोय, डॉक्टरही सांगतात कि आजकालच्या आजारांचे मूळ कारण आपले पोट आहे आणि ते खराब होते ते बाहेरच्या अनहेल्दी खाण्यामुळे. अनेकांना घरचं जेवण हवंय मात्र ते बाहेर मिळत नाही आणि तेच मिळून देण्यासाठी प्रत्येक घरातील आई, सुगरण एकत्र आल्या आणि मायमा प्लॅटफॉर्म सुरु झाला. यावर तुम्ही हॉटेल ऐवजी अगदी तुमच्या बाजूच्या घरांमधून जेवण ऑर्डर करू शकता. थोडक्यात, प्रत्येक मायमा (गृहिणी) रोज तिच्या घरी ती काय जेवण बनवणार आहे ते मायमा अँप वर सांगते, अशा पद्धतीने खाणाऱ्याला त्याच्या जवळपासच्या प्रत्येक घरामध्ये काय-काय जेवण बनतेय ते कळते आणि त्यातून त्याला हवं ते जेवण ऑर्डर करतो. म्हणजे त्याला घरच्या सारखं नाही तर घरचंच जेवण मिळतं ते हि बाजूच्या घरामधूनच.

मायमा म्हणून नेमकं काम काय करायचं?

मायमा म्हणून काम करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करायचं नाही, रोज स्वयंपाक बनवता तेच करायचे आहे.

प्रत्येक मायमा घरी रोज जो काही स्वयंपाक करणार आहे ते मायमा अँपवर सांगा. काही स्पेशल मेनू नाही, जे रोज तुमच्या घरच्यांसाठी बनवणार तेच सांगा.

कस्टमर्स (खाणारे) त्यांच्या जवळपासच्या प्रत्येक घरात काय जेवण बनवले जाणार आहे ते पाहून त्यांच्या आवडीप्रमाणे त्या मायमाला त्यांच्यासाठीही जेवण बनविण्यासाठी सांगतात..

मायमा तिच्या घरच्या स्वयंपाकाबरोबर आलेल्या ऑर्डर्ससाठीही जेवण बनवते. कस्टमर्स स्वतः येऊन ऑर्डर घेऊन जातात किंवा आम्ही ती कस्टमर्सपर्यंत पोहोच करतो.

मायमा का व्हावे?

प्रत्येकाला घरच्या सारखं नाहीतर घरचंच जेवण मिळावं आणि प्रत्येक सुगरणीला तिच्या पाककलेमुळे एक नवी ओळख मिळावी हे सर्वात मोठे कारण आहे तुम्ही मायमा मध्ये सहभागी होण्यासाठी.

  • मायमा संकल्पनेत सहभागी होऊन हेल्दी भारत बनविण्यामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होता येईल.
  • जे घरात बनवता तेच जेवण बनवायचे, वेगळे काही बनवायचे नाही
  • प्रत्येक सुगरणीला तिच्या पाककलेचं कौतुक करणारा खवय्या हवा असतो आणि आपल्या मायमा प्लॅटफॉर्मवर तर मनापासून कौतुक करणाऱ्या खवय्यांची कमीच नाही.
  • उत्तम स्वयंपाक सगळ्यांनाच करता येत नाही आणि तुम्हाला तो येतो तर तुमची हि पाककला जगासमोर आणायलाच हवी.
  • हवी तेव्हा सुट्टी, रोज करायलाच हवं असं काही बंधन नाही.
  • कोणता पदार्थ बनवायचा, ऑर्डर्स किती घ्यायच्या, जेवणाचे दर काय ठेवायचे इ. सर्व काही तुम्हीच ठरवायचे. आम्ही कुठल्याही प्रकारे यामध्ये हस्तक्षेप करत नाही.
  • मायमा होण्यासाठी रजिस्ट्रेशन फी नाही, प्रत्येक ऑर्डर मधून कमिशन नाही. मायमा प्लॅटफॉर्म मोफत आहे.
  • प्रत्येक ऑर्डरचे पेमेंट कस्टमरकडून ऍडव्हान्स (आगाऊ) घेतलं जातं त्यामुळे ऑर्डर तयार झाल्यावर कोणी स्वीकारली नाही तर तुमचे नुकसान होणार नाही.
  • मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये असलेले आपले मायमा अँप वापरायला अत्यंत सोपे आहे.
  • घरबसल्या, घरचा स्वयंपाक करता-करता करता येणारे काम जे पैशांबरोबर समाधानही मिळून देते.
  • कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
  • हा व्यवसाय कसा करायचा याचे पूर्ण मार्गदर्शन आम्ही देऊ.
  • प्रत्येक खाणाऱ्याला आपल्यामुळं पोटभर आणि हेल्दी जेवण जेवतोय याचा आनंद.

मायमा म्हणून कसे काम सुरु करायचे?

मायमा होण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आणि निःशुल्क आहे. मायमा अँप डाउनलोड करून तळाच्या फोटोवर क्लिक करून मायमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करा.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मायमा अँप इन्स्टॉल करावे लागेल आणि त्यामध्ये पुढील प्रमाणे रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

तुमच्याबद्दल माहिती

मायमा म्हणून रेजिस्टर करण्यासाठी तुमच्याबद्दल काही माहिती द्या जसे कि तुमचे नाव, पत्ता, इ.

आवश्यक कागदपत्रे

येथे तुम्हाला आयडी प्रूफ आणि ऍड्रेस पप्रूफ साठी आधार कार्ड द्यायचे आहे.

फूड लायसन्स

FSSAI रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्या. काळजी करू नका, तुमच्याकडे हे नसेल तर त्यासाठी आम्ही मदत करू.

मायमा म्हणून काम सुरु

आम्ही आपण दिलेली माहिती तपासून तुमचे अकाउंट सुरु करतो आणि अभिनंदन, झालात तुम्ही सर्वांच्या मायमा.

बाजूच्या घरातून प्रत्येकाला हेल्दी आणि टेस्टी जेवण देणारा, प्रत्येक आईनं पुढाकार घेऊन बनवलेला

भारतातील पहिला फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म... मायमा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे (FAQ)

पुढील माहिती नंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट द्वारे आमच्याशी संपर्क साधा.

मायमा म्हणजेच आई, एक सुगरण जी आईप्रमाणे प्रेमाने आणि रुचकर जेवण बनवून देते; 'कस्टमर' म्हणजे खवय्ये... आणि या दोघांना जोडणारा प्लॅटफॉर्म म्हणजे 'मायमा प्लॅटफॉर्म'

नाही. मील केव्हा पब्लिश करणे हे पूर्णतः तुमच्यावर आहे, याकरिता आमचे कुठलेच बंधन नाही. तुम्हाला शक्य असेल तेव्हाच तुम्ही मील पब्लिश करावे.

तुम्ही मायमा प्लॅटफॉर्मद्वारे कस्टमर्सला जेवण देणार आहेत आणि त्यासाठी प्लॅटफॉर्मकडे तुमची संपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कस्टमर्स ऑर्डरचे पेमेंट ऑनलाईन करतात आणि ते तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जमा होतात त्यासाठी तुमचे बँक खात्याची माहिती आवश्यक आहे. लक्षात असू द्या, आमचे प्रतिनिधी बँकेचा OTP मागत नाही. मायमा मील्स प्रा. लि. कडे तुमचे कागदपत्रे सुरक्षित आहेत आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर केला जात नाही.

होय, मायमा प्लॅटफॉर्म पूर्णतः मोफत आहे. कुठल्याहीप्रकारची रजिस्ट्रेशन फी नाही, ऑर्डर मधून कमिशन नाही. "मायमा" स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा एक सामाजिक उपक्रम आहे. आमचा उद्देश प्रत्येकाला घरचं जेवण मिळावं आणि प्रत्येक सुगरणीला स्वतःची एक नवी ओळख मिळावी हा आहे आणि त्यामुळे त्यासाठी लागणारा मायमा प्लॅटफॉर्म आम्ही मोफत ठेवला आहे.
टीप : ऑनलाईन ऑर्डर पेमेंट आणि प्रत्येक ऑर्डर आल्यावर तुम्हाला येणाऱ्या कॉल सुविधेसाठी तुमच्या प्रत्येक ऑर्डरमधून नाममात्र ५% प्लॅटफॉर्म फी आकारली जाते.

एकंदरीत मायमाची संकल्पना हि खेड्यापासून शहरापर्यंत राबवता येते. जिथं बाहेरचं खाणारे आहे तिथं प्रत्येक घरातील मायमाला संधी आहे. यासाठी लागणारा मायमा प्लॅटफॉर्म म्हणजेच मायमा अँप संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. कोणीही, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मायमावर काम करू शकतात. डिलिव्हरीसाठी Dunzo हे आपले पार्टनर आहेत त्यामुळे डिलिव्हरी सुविधा फक्त ज्या शहरात Dunzo ची सुविधा असेल तेथेच शक्य आहे. जिथे Dunzo नाही तिथे मायमा स्वतः ऑर्डर डिलिव्हर करू शकते किंवा कस्टमर स्वतः येऊन घेऊन जातात.

सर्वप्रथम आपले आभार, तुम्हाला संकल्पना आवडली आणि तुम्ही यामध्ये आमची मदत करू इच्छिता. आपला उद्देश खूप सरळ आहे, प्रत्येक शहरातल्या, प्रत्येक गल्लीतल्या, प्रत्येक घरामध्ये मायमा हवी आणि प्रत्येक बाहेर खाणाऱ्याच्या पोटात हेल्दी आणि घरचं जेवण हवं. तर तुम्हीच सांगा या कामामध्ये तुम्ही काय मदत / काम करू इच्छिता? कृपया [email protected] वर ई-मेल करून सविस्तर माहिती द्या. आमची टीम आपल्याशी संपर्क साधतील.

Swayampoorna Logo

प्रत्येक होतकरू महिलेला तिची एक नवी ओळख मिळवून देण्यासाठी सहानुभूती न देता संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वयंपूर्णा फाऊंडेशनची सुरुवात करण्यात आली. आम्ही मानतो कि प्रत्येकीमध्ये काहीनाकाही कौशल्य आहे जे तिला तिची एक नवी ओळख निर्माण करून देऊ शकते, तिला तिच्या पायावर उभं करू शकते.. गरज असते फक्त तिने ते ओळखण्याची आणि कोणीतरी तिला लढ म्हणण्याची. स्वयंपूर्णा फाऊंडेशनमध्ये सर्व समविचारी महिला एकत्र येऊन एकमेकींना पुढं जाण्यासाठी प्रवृत्त करतात, मदत करतात.

आमच्या या कार्यात तुम्हीही हातभार लावू शकता. आम्हाला तुमची आर्थिक मदत नकोय, पैशांऐवजी तुमच्या कौशल्याची देणगी द्या.

अधिक माहिती
Swayampoorna Foundation